Ad will apear here
Next
‘मांज्याने जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाइन’
डॉ. कल्याण गंगवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कल्याण गंगवालपुणे : ‘मकर संक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरू झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे; मात्र चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे, तरीही छुप्या पद्धतीने हा चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणार्‍या या चीनी मांजा विकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाइन सुरू केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

डॉ. गंगवाल म्हणाले, ‘जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरू होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. गेल्या वर्षी सुवर्णा मुजुमदार या महिलेच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने त्यांनी आपला जीव गमावला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे; मात्र शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे.’

‘या मांजाला अनेक पक्षीही बळी पडतात. यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १५ वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास १५० पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहीम राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे,’ असे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

जखमी पक्ष्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक :
डॉ. कल्याण गंगवाल :
९८२३० १७३४३,
सुनील परदेशी : ९८२३२ ०९१८४,
अनिल अवचिते :
९४२२३ ४९७८९
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZSYBW
Similar Posts
‘श्वानांच्या शर्यतींवर तात्काळ बंदी घालावी’ पुणे : ‘प्राण्यांनाही सुखाने जगण्याचा अधिकार आहे; मात्र मनोरंजन आणि आर्थिक दृष्टीकोनातून प्राण्यांच्या शर्यती लावण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. नुकत्याच सणसर येथे श्वानांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये कोंबड्या आणि श्वानांना अतिशय क्रूरतेने हाताळले गेले. त्यामुळे श्वानांच्या शर्यतींवर केंद्र आणि
माहेश्वरी समाजाच्या धनुर्मास उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : ‘माहेश्वरी समाजातर्फे आयोजित धनुर्मास उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उत्सवाला १७ डिसेंबर २०१८ पासून प्रारंभ झाला असून, मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०१९ रोजी सांगता होणार आहे,’ अशी माहिती माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगीरथ राठी यांनी पत्रकाद्वारे दिली
गंगवाल परिवारातर्फे पुण्यात ‘बर्ड फिडर’ पुणे : शहरातील डॉ. कल्याण गंगवाल परिवारातर्फे भगवान महावीर जयंतीनिमित्ताने पुणे आणि परिसरात मोफत एक हजार आठ बर्ड फिडर व १०८ बर्ड नेस्ट (पक्ष्यांची कृत्रिम घरटी) लावण्यात येणार आहेत.
डॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान पुणे : श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजातर्फे अहिंसा, भूतदया आणि शाकाहार प्रसारात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language